Ancient Indian Science
प्राचीन भारतीय तत्वदर्शन आणि निसर्ग विचार
pracheen-bhartiya-tatvdarshan-blog-img

पर्यावरण, निसर्गसंवर्धन आणि शाश्वतविकास तसेच प्राचीन भारतीय तत्वदर्शन हे माझ्या आवडीचे आणि अभ्यासाचे विषय आहेत. “निसर्ग, मानव आणि शाश्वत विकास”, हा तर आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. वर्तमानकाळातील स्थिती वर प्राचीन भारतीय तत्वदर्शना दृष्टीने केलेलं भाष्य असं या लेखमालेचे स्वरूप आहे.

भारतीय तत्व दर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे, सर्वसमावेशक असा सखोल दृष्टिकोन, “सर्वेपीसुखिनःसंतु, सर्वेसंतुनिरामय: ” अशी समदृष्टी बाळगणारी कल्याणकारी चिरंतन मूल्ये आणि सर्वांना शाश्वत समाधान हे उद्दिष्ट असणारी निसर्गप्रेरित जीवनपद्धती, यांचा मागोवा या लेखमालेतून घेतला जाईल. सद्यकाळातील जीवनशैली, तिची वैशिष्ट्ये, नव्याने निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या मानवनिर्मित समस्या आणि त्यातुन आलेली अस्थिरता या पार्श्वभूमीवर प्राचीन भारतीय मूलभूत तत्वज्ञानात काही तोडगे सापडतात का हे शोधण्याचा हा एक प्रयत्न आहे.

सर्वप्रथम, ज्या आचार्यांच्या प्रकाशगुरूकुलात भारतीय निसर्ग आणि पर्यावरण या विषयाचे धडे गिरवले, ज्यांच्या शिकवणुकीमुळे शाधवत विकास आणि निसर्ग या विषयाची ओळख झाली त्या आचार्यांच्या स्मृतीस सादर अभिवादन करून प्रस्तुत लेखनास सुरूवात करत आहे.

भारतीय उपखंड आणि तिथली निसर्ग संपदा, पर्यावरण हे एकमेवाद्वितीय (युनिक) आहे, वैविध्यपूर्ण आहे, भारतीय विचार मानस ज्या तत्व चिंतनाच्या परंपरेतून घडत गेले त्या भारतीय तत्वज्ञान आणि धर्माचे अधीष्ठान लाभलेल्या संस्कृतीमुळे, पारंपरीक शहाणपणातून इथला निसर्ग सुरक्षित राहिला. प्राचीन भारतिय तत्वचिंतन, भारतीय दर्शन आणि निसर्ग विचार हे एकमेकांपासून वेगळे काढताच येत नाहीत. भारतीय संस्कृती, पर्यावरण आणि इथली जीवनशैली अभिन्न आहेत, परस्पर पूरक आहेत. अशा Holistic Approach ने पहिले तर हे भारतीयत्व म्हणजे नेमके काय ते नीट उलगडते.

जगातल्या इतर भूभागात केवळ दिड वा दोन सहसर्त्रकांपूर्वीच उदयाला आलेल्या काही संघटित आणि आक्रमक धर्मांच्या मलुष्यकेद्रि विचारसरणी पेक्षा भारतीय तत्वज्ञान हे खूप नियळे आहे, सर्वार्थाने व्यापक आणि समग्र आहे. प्राचीन भारतीय तत्वदर्शन असे सांगते की, निसर्ग सृष्ते सर्वसमावेशक आहे.

मनुष्य प्राणी हा सृष्टीचा एकमेव उपभोगी अथवा स्वामी नसून तो तर या समस्त सृष्टीचा आणि निसर्ग संपदेचा केवळ विधस्त आहे रक्षक आहे. त्यामुळेच, त्याच्यावर इतरांच्या कल्याणाची, रक्षणाची जवाबदारी आहे. म्हणूनच त्याने नैसर्गिक संपत्तीचा वापर डोळसपणे, विवेकानेच करणे अपेक्षित आहे. निसर्ग आणि माणूस यामध्ये द्वैत नसून त्यांच्या मध्ये एकात्म भाव आहे.

“तत्वमसी” अर्थात ते तूच आहेस हेच जीवनसूत्र प्राचीन तत्वचिंतनातून वारंवार सांगितले गेले आहे. गीतेत म्हटले आहे, सर्व चराचरात ब्रह्म व्यापून राहिले आहे. सजीव निर्जीव घटकांनी व्याप्त असेलेली ही सृष्टी या ब्रह्माचाच आविष्कार आहे.

निसर्गात भरुनी राहे अनादी अनंत…

भारतीय तत्वदर्शन असे मानते की, प्रत्येक जीवमात्राच्या ठायी या ब्रह्माचे अर्थात निसर्गाचेच अस्तित्व आहे “अहं ब्रह्मास्मि” प्रत्येक घटक ब्रह्म आहे! समग्र चराचर सृष्णेतच देव आहे, तो दूर कुठे स्वर्गात, आकाशात नसून सर्वत्र आहे. सृष्टी सर्वांची आहे. फक्त मनुष्याच्या उपभोगासाठी नाही, ही संकल्पनाच किती सर्वव्यापी सर्व समावेशक आहे. त्यामुळे मुनष्याने योग्य रीतीने (according to standard protocol) आणि आवश्यक तितकाच सृष्टीचा उपभोग घ्यावा आणि प्रत्येकाने आपले जीवन समाधानाने व्यतीत करावे. ते कसे असावे याविषयी मार्गदर्शन केलेले आहे ते मार्गदर्शन म्हणजेच आजच्या भाषेत डेझ, “Standard Opertaing Procedure”!

ज्ञानी ऋषीमुनींनी मनुष्याच्या लोभी स्वभावापासून नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व्हावे यासाठीच, त्यांच्या नियंत्रित वापरासाठी अनेक यम नियम घालून दिले. आचार विचार, आहार विहार यासाठीच्या चाली रीती या शिकवणुकीतूनच निर्माण झाल्या. म्हणूनच मनुष्याचा जो स्वभावधर्म आहे त्यानुसार त्याला जीवन लाभो अशी प्रार्थना करताना संत ज्ञानदेव म्हणतात ना, ‘जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात”!

सर्वाप्रती ठेवलेल्या सम दृष्टीची आणि व्यापकतेची ही परिसीमा च. नव्हे काय! एकीकडे सद्य काळातील आपले आयुष्य, व्यक्ती आणि समाज यांच्या अनुषंगाने निर्माण होणारे अनेक प्रश्न, गुंते, त्याकडे बघण्याचा व्यक्ती सापेक्ष दृष्टिकोन आणि त्याच्या मर्यादा आणि दुसरीकडे काळाचा एक विशाल पट, समृद्ध ज्ञानाच्या प्राचीन परंपरेचा वारसा, मनुष्यमात्राच्या सर्व प्रश्नांना भिडणारी, त्यांची समर्पक उत्तरे देणारी भारतीय तत्वज्ञानाची अनेक समृद्ध दालने आहेत. या कालातीत, विचारगर्भ ज्ञानदर्शनाने आपण विस्मयचकीत होऊन जातो.

उदाहरणादाखल, आत्ताची आपल्या सर्वांनाच भेडसावत असलेली पर्यावरणाच्या ऱ्हासाची समस्या घेऊ. या समस्येचे मूळ हे देखील मनुष्याच्या उपभोगलोलुप वृत्तीत आहे असे दिसते. मात्र मनुष्याची ही वृत्ती आणि सुखलोलुप स्वभाव तर पूर्वापार तसाच असणार!

मग प्राचीन काळात त्यावर काय उपाय शोधला असेल बरं? असे दिसते की, या विषयावर अत्यंत सखोल आणि मर्मग्राही विश्लेषण भारतीय तत्वज्ञानांत केलेले आहे. एकदा समस्या जाणून घेतली की मग त्याचे निराकरण करणे शक्‍य आहे.

मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो:।
बन्धाय विषयासक्त मुक्तुयै निर्विषयं रुमृतमब।।
(ब्रह्मबिंदू उपनिषद, श्रीमदभगवद गीता ६.५)

मन हे च सर्व माणसांच्या बंधनाचे आणि मोक्षाचे देखील प्रमुख कारण आहे. विषय सुखाची आसक्ती असणारे मन हे बंधनाचे तर अनासक्त मन हे मुक्ती चे मोक्षाचे कारण आहे असे उपनिषदामध्ये आणि गीतेत सांगितलेले आहे.

बग्धाय विषयाडडसक्तं मुक्तये निर्विषयं मज:।
मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो:1॥
(चाणक्य-नीतिः:-१३.११ )

वाईट गोष्टीमध्ये मन गुंतवणे म्हणजेच बंधन असून यातुन मन काढून घेतल्यास मोक्षाचा मार्ग दिसतो. याप्रमाणे हे मन च मनुष्याला बंधनात अडकवते किंवा मुक्ती देखील देते. असे चाणक्य नीति मध्ये सांगितले आहे.

या तत्व दर्शनातून हे लक्षात येते की, माणसाचे चंचल मन हेच जरी त्याच्या उपभोगांचे गुलाम होण्याचे कारण असले तरी ही योगसाधनेने सिद्ध झालेले मन च त्याच्या मुक्तीचेही कारण बनते.माणसाचे सदैव इंद्रिय उपभोगाकडे झुकणारे मन आणि त्यातून होत असणारे निसर्गाचे अनिर्बंध शोषण ही आजच्या युगातली एक अत्यंत जटिल अशी समस्या झाली आहे. मानवाला विवेकी उपभोक्ता व्हावे लागेल, अविवेकी माणसाला विवेकी बनण्यासाठी प्रवृत्त करणे हाच प्रभावी मार्ग ठरेल. अशा ठिकाणी प्राचीन तत्वज्ञानामधून मार्गदर्शन घेणे अत्यंत सयुक्तिक आणि अगत्याचे ठरते.

भारतीय तत्व दर्शनात केलेली मनुष्याच्या ठायी असलेल्या या क्षमतांची ही चर्चा अत्यंत मूलभूत आणि कालातीत अशीच आहे. विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे आपले प्राचीन क्रषी मुनी हे तर विश्वाचे आणि वास्तवाचे संपूर्ण भान असणारे, शास्त्रशुद्ध विचार करणारे दार्शनिक होते. त्यांनी मनुष्य स्वभावाचे, मनुष्याच्या ठायी असणाऱ्या सबलतेचे आणि दुर्बलतेचे नेमके विश्लेषण केले होते त्यातले कच्चे दुवे नेमके हेरले होते. मनुष्याच्या ठायी असणाऱ्या निरनिराळ्या क्षमतांचे असुरी आणि दैवी संपत्ती असे वर्गीकरण केले होते. मनुष्याने स्वत:च्या क्षमता ओळखून सन्मार्गाने जीवन व्यतीत केले असता त्याला सुख समाधान लाभेल असा निर्वाळा देखील दिला आहे. सर्वांचे कल्याण शाध्वत आणि सुखी सुसंकृत सहजीवन हाच यामागचा उदात्त हेतू होता.

आज आपण सर्व ज्या शाद्वत विकासावर आधारित जीवनशैलीची आकांक्षा बाळगतो त्याची मुळं आपल्या प्राचीन संस्कृतीत किती खोलवर रूजली आहेत हे समजून घेणे फार आवश्यक आहे.सनातन प्राचीन भारतीय परंपरा म्हणजे टाकाऊ, प्रतिगामी, मागास असे शिक्के मारून आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेत आहोत. पाश्चूयात्य शिक्षणाचे अंधानुकरण करण्याऐवजी त्यातल्या चांगल्या मूल्यांचा स्वीकार करुन त्यातल्या त्रुटींचा डोळसपणे त्याग करायला हवा.भारतीय लोकांनी तरी आपल्या पारंपरिक शहाणपणाचे पुनरूज्जीवन करणे आवश्यक आणि सर्वांच्याच हिताचे आहे.

नैसर्गिक साधनांची हेळसांड करणाऱ्या, मानवी मूल्यांची पायमल्ली करणाऱ्या वैज्ञानिक संशोधनाच्या स्वार्थी उद्दि्टंवर निर्भयपणे प्रश्न विचारायला हवेत. विज्ञान विधातील आंधळ्या स्पर्धेपायी सृष्टीच्या नैसर्गिक संतुलनामध्ये केली जाणारी अनियंत्रित ढवळाढवळ समस्त जगाला विनाशाच्या कडेलोटावर कशी घेऊन जाते हे, कोरोना ग्रस्त जगाला आता आता वेगळे सांगायची आवश्यकता नाही! विज्ञानाचा, विकासाचा, भौतिक प्रगतीचा ठेका केवळ आपणच घेतला आहे या भ्रमात असलेल्या आधुनिक काळातील मानवाचे उद्दाम वर्तन आणि ज्या फांदी वर बसला आहे त्यावरच घाव घालण्याचा मूर्खपणा हा सर्वांच्याच विनाशास कारणीभूत ठरतो आहे. पुढच्या लेखात सृष्टीची उत्पत्ती आणि भारतीय तत्वदर्शन याबाबत बोलू. हा फार विशाल आणि आव्हानात्मक विषय आहे. असे म्हटले जाते की उंच डोंगर चढायला कितीही कठीण असला तरी तो सर करण्याची आकांक्षा असेल तर एखादी वाट सापडतेच.

One thought on “प्राचीन भारतीय तत्वदर्शन आणि निसर्ग विचार

  1. आशुतोष रामदास कुमठेकर, अरूणाचल प्रदेश says:

    झकास, सुरुवात आपल्या पासूनच करावी, आपल्या चालू जीवन शैलीची पर्यावरणीय किंमत काढावी आणि निसर्ग साखळ्यांच्या मर्यादेत ‘Refuse, Reuse, Recycle, Renewable and Respect ‘ या पाच R चा वापर करून ‘ निसर्गायन, सम्यक विकास, small is beautiful, ‘ या राजेंद्र भट काका , दिपकभाई सचदे, भास्करभाई सावे, दिलीप दादा, पौर्णिमा ताई कुलकर्णी, रेणू ताई – राजा दांडेकर, धिरेंद्रभाई स्मिताबेन सोनेजी या परिव्राजक गटात सहभागी व्हावं… आपण शहरात सिमेंट च्या घरात राहणार, प्रचंड प्रदूषण करणार, स्वतः च आणि पर्यावरणाचं … आणि गप्पा मात्र मारणार निसर्ग संवर्धन करण्याचे… थोडं मागे वळून पाहूया आज पर्यंतची माझ्या जीवनशैलीची पर्यावरणीय किंमत आणि त्यावरचे माझे उपाय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *