Spiti Valley : Everything is Beautiful #3
सकाळी खोलीतुन समोर किन्नर कैलास चे दर्शन झाले. सुर्योदय पर्वताच्या पाठीवर होतो. किन्नर कैलासची भव्यता डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. नुसतं दर्शन देखील गुढ व गंभीर आहे. पाठीवर होणारा सुर्योदय अप्रतिम सौंदर्याचा साक्षात्कार होता.