भारतीय तत्वदर्शन आणि सृष्टीची उत्पत्ती : भाग २
नासदीय सूक्त जितके प्रसिद्ध आहे त्यामानाने, भारतीय तत्वज्ञ आणि शास्त्रज्ञ महर्षी कणाद यांचे "वैशेषिक सूत्र" हे फारसे माहिती नसते. या ग्रंथामध्ये वेदांचे प्रामाण्य मान्य करुन सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी अगदी तर्कसंगत असे विचार मांडलेले आहेत.