Art and Music
भारतीय संगीत व वाद्ये
bhartiy-sangeet-vadya-blog-img

प्राचीन काळापासून भारतीय शास्त्रीय संगीताचे अस्तित्व असल्याचे विविध ग्रंथांवरून समजते. साम वेद, नाट्य शास्त्र, संगीत रत्नाकर यासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये त्याचे संदभभ सापडतात. वेदांमध्ये प्रामुख्याने साम वेदामध्ये ‘ऋचा’ कोणत्या प्रकारे गायल्या पाहिजेत ह्याचे वणभन आढळते. विविध पुराणांमध्ये जसे की भागवत पुराण, माकंडये पुराण, वायुपुराण यांमध्ये सुद्धा संगीताचे संदभभ सापडतात. रामायण तसेच महाभारत यांमध्ये सुद्धा विशेष प्रसंगात जसे राज्याभिषेक, युद्ध, लग्न समारंभ या मध्ये गायन व वादनाचा उल्लेख आढळून येतो.त्याच प्रकारे आपल्याला हे ही आढळून येते की हिंदू देवदेवता सुद्धा विविध वाद्यांचे वादन करतात जसे की श्रीकृष्ण बासरी वाजवायचे, सरस्त्वती देवी वीणा वादन करते ,शंकर भगवान डमरू वादन करतात. या सर्व संदर्भावरून असे दिसते की भारतीय संस्त्कृती मध्ये संगीताला अत्यतं महत्वाचे स्थान आहे.

भारतीय शास्त्रीय संगीत प्रामुख्याने ३ भागात विभागले आहेत ते म्हणजे कंठ संगीत (गायन), वाद्य संगीत (वादन) आणि नृत्य . यामध्ये कंठ संगीत हे स्वर प्रधान तर वाद्य संगीत ते ताल प्रधान असते तसेच नृत्यामध्ये गायन व वादन या दोन्हींचा प्रयोग केला जातो.

आता आपण वाद्य संगीताबद्दल विचार करू. वाद्य व वादन यांची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती आपल्याला भरत मुनींनी लिहिलेल्या ‘नाट्यशास्त्र’ या ग्रंथात पाहायला मिळते. हा ग्रंथ इ. स. पूर्व २०० ते इ. स. २०० या कालावधीमध्ये लिहिला गेला आसवा. या ग्रंथामध्ये वाद्यांचे वर्गीकरण ४ भागांमध्ये केले आहे हे वर्गीकरण वाद्यातून ध्वनी कोणत्या माध्यमातून उत्पनन होतो यावर आधारलेले आहे. हे ४ भाग म्हणजे तत वाद्ये , सुभशर वाद्ये, घन वाद्ये आणण अवनद्ध वाद्ये.

bhartiy-sangeet-vadya-blog-inner-img-01

तानपुरा

तत म्हणजे तार ,तारेचा वापर करून ज्या वाद्यातून ध्वनी उत्पनन होतो त्यांना तत वाद्ये किंवा तंतु वाद्ये म्हणतात. उदाहरणार्थ वीणा, सारंगी, सतार, संतरू इत्यादी. ह्या वाद्यांचा वापर स्वर संगीतामध्ये होतो. कंठ संगीताप्रमाणे या वाद्यांमधून विविध रागांचे वादन होते. ज्या वाद्यांना छिद्र आसते व जी हवेच्या मदतीने वाजवली जातात त्यांना सुशिर वाद्ये म्हणतात. उदाहरणार्थ बासरी, सनई ,शंख इत्यादी. तत वाद्यांप्रमाणे या वाद्यांचा वापर स्वर संगीतात होतो.

घन वाद्यांमध्ये धातुंवर आघात करून ध्वनी उत्पनन के ला जातो. उदाहरणार्थ टाळ, मंजिरा, जल तरंग, करताल इत्यादी. ह्या वाद्यांचा वापर तालाचे आवतभन दाखवण्यासाठी होतो. अवनद्ध वाद्ये म्हणजे ज्या वाद्यांमध्ये कातड्याचा वापर केलेला आसतो व त्यांवर हाताने किंवा काठीने आघात करून ध्वनी उत्पनन केला जातो. ह्या वाद्यांना चर्मवाद्य असेही संबोधले जाते. ही वाद्ये आतून पोकळ आसतात उदाहरणार्थ पखवाज, तबला, ढोल, पटह इत्यादी.

bhartiy-sangeet-vadya-blog-inner-img-02

पखवाज (मृदंग)

प्रथम अवनद्ध वाद्यांची रचना स्वाती मुनींनी केली. स्वाती मुनि एकदा तलावाकाठी गेले असताना, पावसाच्या पाण्याचे थेंब कमळाच्या पानावर पडण्यामुळे अत्यंत मधुर ध्वनी उत्पनन होत होता. या ध्वनीपासून प्रेरणा घेऊन स्वातीमुनींनी विश्वकर्माच्या मदतीने त्रीपुष्कर वाद्याची रचना केली. या पुष्कर वाद्यांमधून पुढे विविध चर्म वाद्यांची रचना झाली यामध्ये मदृंग, पणव व दर्दुर ही प्रमुख वाद्ये होती. यातील मदृंग म्हणजे पखवाज या वाद्याची माहिती आपण पुढील लेखात पाहू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *